दिनांक 15 जुलै 2026 रोजी संस्थेत दुसरा रोजगार मेळावा यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात Velangi Connectivity Pvt. Ltd., छत्रपती संभाजीनगर आणि Umasons Auto Components, छत्रपती संभाजीनगर या दोन नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला.
कंपनी प्रतिनिधी श्री. ए. ए. कुलकर्णी आणि श्री. निखिल शर्मा यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप व रोजगार संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या मेळाव्यात 50 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते आणि सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना Offer Letter देण्यात आले — ही संस्थेसाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे.
दिनांक 23 जुलै 2026 रोजी संस्थेत तिसरा रोजगार मेळावा यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. Eagle Hi-Tech Industrial Corporate Pvt. Ltd. या नामांकित भरती संस्थेने सहभाग नोंदविला. सदर कंपनी विविध बहुराष्ट्रीय (MNC) कंपन्यांसाठी शिकाऊ उमेदवारी व रोजगार भरती प्रक्रिया राबवित असून उमेदवारांची सरकारी नोंदणी, क्लेम प्रक्रिया तसेच करिअर मार्गदर्शनाची संपूर्ण जबाबदारी पार पाडते.
विद्यार्थ्यांना 8 तास व 12 तास अशा दोन प्रकारच्या शिफ्टमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध असून, त्यानुसार ₹17,500 ते ₹23,000 पर्यंत मासिक स्टायफंड मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. शासनामार्फत मिळणारे वार्षिक प्रोत्साहन (Incentive) तसेच करिअरमधील प्रगतीच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी, निवास व्यवस्था, हॉस्टेल, मेस, प्रवास, कॅन्टीन सुविधा तसेच PF, ESIC आणि इतर लाभ यांचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्राधान्य ट्रेड: इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, फिटर, वायरमन, वेल्डर, CNC मशीनिस्ट, COPA, टर्नर, फाउंड्रीमॅन. इतर सर्व ट्रेडमधील विद्यार्थ्यांनाही Job Work स्वरूपात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.
संस्थेचे प्राचार्य, सर्व शिल्प निदेशक व प्रशिक्षण अधिकारी यांच्या सहकार्यामुळे रोजगार मेळावा यशस्वीरीत्या पार पडला.
संस्थेत लवकरच दोन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. पहिला — दिनांक 15 जुलै 2026 (बुधवार) रोजी सकाळी 09:30 पासून शासकीय आय.टी.आय. (आदिवासी), किनवट येथे, ज्यात Velangi Connectivity Pvt. Ltd. व Umasons Auto Compo Pvt. Ltd. या कंपन्या सहभागी होणार आहेत. दुसरा — दिनांक 23 जुलै 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता संस्थेच्या मुख्य सभागृहात, ज्यात Hi-Tech कंपनी सहभागी होणार आहे. दोन्ही मेळावे सर्व ट्रेडच्या ITI प्रशिक्षणार्थी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी खुले आहेत. इच्छुक उमेदवारांनी बायोडेटा, आधार, शैक्षणिक प्रमाणपत्रे व पासपोर्ट फोटोसह वेळेच्या 15 मिनिटे आधी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी संपर्क: श्री. नितीन देशपांडे (गट निदेशक), मो. 9422543341.
एकूण जागा: 500+ संधी · रोजगार मार्ग: अप्रेंटिसशिप (NAPS/NATS) व कायमस्वरूपी प्रॉडक्शन ट्रेनी पदे — पुणे, रांजणगाव, चाकण व छ. संभाजीनगर येथे.
हा रोजगार मेळावा यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. मा. प्राचार्य श्री. सुभाष परघणे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री. नितीन देशपांडे (TCPO / गट निदेशक) यांच्या समन्वयाने नियोजन व अंमलबजावणी करण्यात आली. खालील सर्व निदेशक व कर्मचाऱ्यांचे बहुमोल सहकार्य लाभले:
सर्व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मेळावा सुनियोजित व यशस्वी ठरला. 🙏