📞 02469-XXXXXX  |  📧 iti.kinwat@dvet.gov.in  |  महाराष्ट्र शासन
DVETITI
Government Industrial Training Institute

हुतात्मा गोंडराजे शंकर शाह रघुनाथ शाह शा.औ.प्र.संस्था, किनवट

किनवट, जि. नांदेड | कौशल्यं बलम्
मुख्यपृष्ठ  ›  महिला तक्रार निवारण समिती
Women's Grievance Redressal Committee (POSH)

महिला तक्रार निवारण समिती

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, बंदी व निवारण) कायदा, 2013 अंतर्गत स्थापित अंतर्गत तक्रार समिती (Internal Committee).

समितीबद्दल

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, बंदी व निवारण) कायदा, 2013 (POSH Act, 2013) अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांचे संरक्षण व त्यांच्याकडून प्राप्त तक्रारींची त्वरित व गोपनीयतेने चौकशी करण्यासाठी संस्थेत महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे.

संदर्भ — महाराष्ट्र शासन, महिला व बालकल्याण विभाग शासन परिपत्रक क्र. मकक 2010/प्र.क्र.46/मकक मंत्रालय मुंबई-32, दि. 11 जून 2010. तसेच कार्यालयीन आदेश क्र. औप्रसं/लेखा/2023/345 दि. 13.07.2023.

समितीची रचना

कार्यालयीन आदेश क्र. औप्रसं/किन/आस्था/2025/220 दि. 24.08.2025 नुसार समिती खालीलप्रमाणे पुनर्गठित करण्यात आली आहे:

अ.क्र.नावपदनामसमितीतील पदमो. क्रमांक
01कु. यु. आर. जोधशिल्प निदेशक — ड्रेस मेकिंगअध्यक्ष9146581301
02श्रीमती ए. एस. मांजळकरवरिष्ठ लिपिकसदस्य सचिव9763306102
03श्री. एन. एस. देशपांडेगट निदेशकसदस्य7058901968
04श्री. कपिल कांबळेसामाजिक कार्यकर्तासदस्य7775604298
05कु. एस. एम. ठोंबरेशिल्प निदेशक — जोडारीसदस्य7058139047
06कु. दिव्या डुकरेप्रशिक्षणार्थी — विजतंत्रीसदस्य9309701857
07कु. निकिता सुंकरवाडप्रशिक्षणार्थी — तारतंत्रीसदस्य

तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया

🟣 SHe-Box — ऑनलाइन तक्रार पोर्टल

SHe-Box (Sexual Harassment electronic Box) हे भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने विकसित केलेले ऑनलाइन तक्रार पोर्टल आहे. कार्यस्थळावरील लैंगिक छळाबाबत (POSH Act, 2013 अंतर्गत) कोणतीही महिला — शासकीय, खाजगी किंवा असंघटित क्षेत्रातील — या पोर्टलवरून थेट ऑनलाइन तक्रार दाखल करू शकते.

🔗 SHe-Box पोर्टलवर तक्रार दाखल करा 🌐 shebox.wcd.gov.in
तक्रारीसाठी संपर्क
अध्यक्षा: कु. यु. आर. जोध — 9146581301
सदस्य सचिव: श्रीमती ए. एस. मांजळकर — 9763306102